YouVersion लोगो
सर्च आयकॉन

जखर्‍या 12:10-14

जखर्‍या 12:10-14 MARVBSI

आणि मी दाविदाच्या घराण्यावर व यरुशलेमेच्या रहिवाशांवर कृपा व विनवणी ह्यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन आणि ज्या मला त्यांनी विंधले त्या माझ्याकडे2 ते पाहतील; एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्याच्यासाठी शोक करतील; ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करतो तसा ते त्याबद्दल खेद करतील. त्या दिवशी मगिद्दोनाच्या खोर्‍यातील हदाद्रीमोनाच्या आकांताप्रमाणे यरुशलेमेत मोठा आकांत होईल. देश आक्रंदन करील, प्रत्येक कुटुंब वेगवेगळे आक्रंदन करील; इकडे दाविदाचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग; इकडे नाथानाचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग; इकडे लेवीचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग; इकडे शिमीचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग; उरलेल्या सर्व घराण्यांतले लोक वेगळे व त्यांचा स्त्रीवर्ग वेगळा असे ते आक्रंदन करतील.