अध्यक्ष2 हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असला पाहिजे; तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका, अनीतीने पैसे मिळवणारा नसावा; तर अतिथिप्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा, मर्यादशील, नीतिमान, पवित्र, संयमी, आणि दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असा असावा; ह्यासाठी की, त्याने सुशिक्षणाने बोध करण्यास व उलट बोलणार्यांना कुंठित करण्यासही समर्थ व्हावे. कारण अनावर व व्यर्थ बोलणारे आणि फसवणारे पुष्कळ लोक आहेत; त्यांत विशेषेकरून सुंता झालेल्यांपैकी आहेत; त्यांचे तोंड बंद केले पाहिजे; जे शिकवू नये ते अनीतीने पैसा मिळवण्यासाठी शिकवून ते संपूर्ण घराण्याच्या विश्वासाचा नाश करतात. त्या लोकांतील त्यांचाच कोणीएक संदेष्टा म्हणतो, “क्रेतीय सदा लबाड, दुष्ट पशू, आळशी व खादाड असतात.” ही साक्ष खरी आहे; म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल, ह्यासाठी की, त्यांनी यहूदी कहाण्या आणि सत्यापासून बहकलेल्या माणसांच्या आज्ञा ह्यांकडे लक्ष न देता विश्वासात खंबीर व्हावे.
तीत 1 वाचा
ऐका तीत 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: तीत 1:7-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ