अहा! तू सुंदर आहेस! माझ्या सखे, तू सुरूप आहेस! तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे नेत्र कपोतांसारखे दिसतात. तुझे केस गिलाद डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या शेरडांच्या कळपासारखे दिसतात. लोकर कातरून धुतलेल्या मेंढ्या जोडीजोडीने येतात, त्यांतल्या कोणाचीही जोडी फुटत नसते, त्यांच्या कळपासारखे तुझे दात आहेत. तुझे ओठ किरमिजी सूत्रासमान आहेत; तुझे मुख रम्य आहे; तुझ्या बुरख्यातून तुझी कानशिले डाळिंबाच्या फाकेसमान दिसतात. तुझी मान दाविदाने शस्त्रागारासाठी बांधलेल्या बुरुजासारखी आहे, त्यावर सहस्र ढाली व वीरांची सगळी कवचे लटकत असतात. भुईकमळांमध्ये चरणार्या हरिणींच्या जुळ्या पाडसांप्रमाणे तुझे कुचद्वय आहे. शिळोप्याची छाया नाहीशी होण्याची वेळ येईपर्यंत मी गंधरसाच्या पर्वतावर, उदाच्या टेकडीवर जाऊन राहीन. माझ्या प्रिये, तू सर्वांगसुंदर आहेस; तुझ्यात काही व्यंग नाही.
गीतरत्न 4 वाचा
ऐका गीतरत्न 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गीतरत्न 4:1-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ