YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रूथ 3:10-13

रूथ 3:10-13 MARVBSI

तो म्हणाला, “मुली, परमेश्वर तुझे कल्याण करो, तू पहिल्यापेक्षा दुसर्‍या खेपेस अधिक प्रेमळपणा दाखवलास; कारण श्रीमंत किंवा गरीब अशा कोणाही तरुण पुरुषाच्या नादी तू लागली नाहीस. तर मुली, भिऊ नकोस, तू म्हणतेस तसे मी तुझ्यासंबंधाने करतो; कारण माझ्या गावच्या सर्व लोकांना ठाऊक आहे की तू सद्‍गुणी स्त्री आहेस. मी तुझे वतन सोडवण्याजोगा जवळचा आप्त आहे खरा, तथापि माझ्याहूनही जवळचा आणखी एक आप्त आहे. तू रात्रभर येथे राहा, आणि सकाळी तो तुझ्यासंबंधाने आप्तकर्तव्य करायला तयार झाला तर बरेच; त्याला ते करू दे; पण तुझ्यासंबंधाने आप्तकर्तव्य करायला तो कबूल झाला नाही तर परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी ते करीन. सकाळपर्यंत निजून राहा.”

रूथ 3 वाचा

ऐका रूथ 3