तिने ह्या प्रकारे संध्याकाळपर्यंत सरवा वेचला. तिने वेचून आणलेला सरवा झोडला, त्याचे एफाभर सातू निघाले. ते घेऊन ती नगरात गेली; तिने काय वेचून आणले ते तिच्या सासूने पाहिले; तसेच तिने पुरे इतके खाऊन उरलेले आणले होते तेही तिला दिले. तिच्या सासूने तिला विचारले, “आज तू कोठे सरवा वेचलास? हे श्रम तू कोठे केलेस? ज्याने तुझा समाचार घेतला त्याचे कल्याण होवो.” मग आपण कोणाच्या शेतात काम केले ते तिने आपल्या सासूला सांगितले; ती म्हणाली, “ज्या माणसाच्या शेतात आज मी काम केले त्याचे नाव बवाज.” नामी आपल्या सुनेला म्हणाली, “ज्या परमेश्वराने जिवंतावर व मृतांवरही आपली दया करायचे सोडले नाही तो त्याचे कल्याण करो.” नामी तिला आणखी म्हणाली, “हा माणूस आपल्या आप्तांपैकीच आहे. एवढेच नव्हे तर आपले वतन सोडवण्याचा त्याला हक्क आहे.” मग मवाबी रूथने सांगितले की, “तो मला असेही बोलला की, ’माझे गडी सर्व कापणी करीपर्यंत त्यांच्या मागोमाग राहा.”’ नामी आपली सून रूथ हिला म्हणाली, “मुली, तू त्याच्याच मोलकरणींबरोबर जावे, इतरांच्या शेतात तू लोकांना आढळू नयेस हे बरे.” ह्या प्रकारे सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत तिने बवाजाच्या मोलकरणींबरोबर सरवा वेचला; आणि ती आपल्या सासूबरोबर राहिली.
रूथ 2 वाचा
ऐका रूथ 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रूथ 2:17-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ