बंधुजनहो, (नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे) मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राची सत्ता त्याच्यावर चालते, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? पती जिवंत आहे तोपर्यंत त्याची विवाहित स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते; पण पती मरण पावल्यावर तिची पतिबंधनातून सुटका होते. म्हणून पती जिवंत असताना ती परपुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी म्हणतील, पण पती मरण पावल्यास ती त्या बंधनातून मुक्त होते; नंतर ती दुसर्या पुरुषाची पत्नी झाली असताही व्यभिचारिणी होत नाही. त्याप्रमाणे, माझ्या बंधूंनो, तुम्हीही ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे नियमशास्त्रासंबंधाने मृत झालात; अशासाठी की, तुम्ही दुसर्याचे म्हणजे मेलेल्यांतून जो उठला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फळ द्यावे. कारण आपण देहस्वभावाच्या अधीन होतो, तेव्हा नियमशास्त्राच्या द्वारे चेतवलेल्या पापवासना आपल्या अवयवांत मरणाला फळ देण्यासाठी कार्य करत होत्या. पण आता ज्याने आपण बद्ध होतो त्याच्यासंबंधाने मृत झाल्यामुळे आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत; म्हणून जुन्या शास्त्रलेखास धरून नव्हे तर आत्म्याच्या नावीन्याने आपण सेवा करतो. तर मग आपण काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे? कधीच नाही! तरीही पापाची ओळख मला नियमशास्त्रावाचून कशानेच झाली नसती. “लोभ धरू नकोस,” असे नियमशास्त्रात सांगितले नसते तर मला लोभाचे ज्ञान झाले नसते. पापाने संधी साधून ह्या आज्ञेच्या योगे माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ निर्माण केला होता; कारण नियमशास्त्रावाचून पाप निर्जीव आहे.
रोमकरांस पत्र 7 वाचा
ऐका रोमकरांस पत्र 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस पत्र 7:1-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ