YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 3:21-27

रोमकरांस पत्र 3:21-27 MARVBSI

आता तर नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्त्व ते प्रकट झाले आहे; त्याला नियमशास्त्राची व संदेष्ट्यांची साक्ष आहे; हे देवाचे नीतिमत्त्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणार्‍या सर्वांसाठी आहे; त्यात भेदभाव नाही. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत; देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्‍चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले. ह्यासाठी की, पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्त्व व्यक्त करावे; म्हणजे आपले नीतिमत्त्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे की, आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणार्‍याला नीतिमान ठरवणारे असावे. तर मग फुशारकी मारणे कोठे? ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्मांच्या काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने.