शास्त्रात असे लिहिलेले आहे की, “नीतिमान कोणी नाही, एकदेखील नाही; समंजस कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही; सर्व बहकले आहेत, ते सारे निरुपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही.” “त्यांचा घसा म्हणजे उघडे थडगे; त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे; त्यांच्या ओठांच्या आत जोगी सर्पाचे विष आहे.” “त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरलेले आहे.” “त्यांचे पाय रक्तपात करण्यास जाण्याकरता उतावळे झाले आहेत; त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहेत; त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही.” “त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.” आपल्याला ठाऊक आहे की, प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते. म्हणून नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही; कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते. ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमत्त्वाची प्राप्ती
रोमकरांस पत्र 3 वाचा
ऐका रोमकरांस पत्र 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस पत्र 3:10-20
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ