तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कोणीही असलास तरी स्वतः तुला सबब नाही; कारण ज्यात तू दुसर्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस; कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस. पण अशा गोष्टी करणार्यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. तर हे मानवा, अशा गोष्टी करणार्यांना जो तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस, तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय? किंवा देवाची ममता तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय?
रोमकरांस पत्र 2 वाचा
ऐका रोमकरांस पत्र 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस पत्र 2:1-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ