YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 16:17-20

रोमकरांस पत्र 16:17-20 MARVBSI

आता बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हांला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडथळे घडवून आणत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर व्हा. कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वत:च्या पोटाची सेवा करतात; आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्याभाबड्यांची अंत:करणे भुलवतात. तुमचे आज्ञापालन सर्वांना प्रसिद्ध झाले आहे, म्हणून तुमच्याविषयी मी आनंद मानतो; तरी जे चांगले आहे त्यासंबंधाने तुम्ही शहाणे असावे आणि वाइटाविषयी साधेभोळे असावे, अशी माझी इच्छा आहे. शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो.