प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकार्यांच्या अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकार नाही; जे अधिकारी आहेत ते देवाने नेमलेले आहेत. म्हणून जो अधिकाराला आड येतो, तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो; आणि आड येणारे आपणांवर दंड ओढवून घेतील. कारण चांगल्या कामाला अधिकार्यांची भीती असते असे नाही, तर वाईट कामाला असते. तेव्हा अधिकार्याची भीती नसावी अशी तुझी इच्छा असल्यास चांगले ते कर म्हणजे त्याच्याकडून तुझी प्रशंसा होईल; कारण तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. पण जर तू वाईट करशील तर त्याची भीती बाळग; कारण तो तलवार व्यर्थ धारण करत नाही; तर क्रोध दाखवण्याकरता वाईट करणार्याचा सूड घेणारा असा तो देवाचा सेवक आहे. म्हणून क्रोधामुळे केवळ नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळेही अधीन राहणे अगत्याचे आहे.
रोमकरांस पत्र 13 वाचा
ऐका रोमकरांस पत्र 13
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस पत्र 13:1-5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ