त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले; तेव्हा मोठा भूमिकंप झाला; ‘सूर्य’ केसांपासून बनवलेल्या तरटासारखा काळा झाला व सगळा ‘चंद्र रक्ता’सारखा झाला; ‘अंजिराचे झाड’ मोठ्या वार्याने हालले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे ‘आकाशातील तारे’ पृथ्वीवर ‘पडले.’ ‘एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश’ गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणांवरून ढळली. ‘पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी’, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे, ‘गुहांत’ व डोंगरांतील ‘खडकांतून लपली;’ आणि ते डोंगरांना व खडकांना म्हणाले, “आमच्यावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या दृष्टीपुढून व कोकर्याच्या क्रोधापासून आम्हांला ‘लपवा.’ कारण त्याच्या ‘क्रोधाचा मोठा दिवस’ आला आहे, ‘आणि कोणाच्याने टिकाव धरवेल?”’
प्रकटी 6 वाचा
ऐका प्रकटी 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रकटी 6:12-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ