YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 6:1-8

प्रकटी 6:1-8 MARVBSI

मग कोकर्‍याने त्या सात शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला ते मी पाहिले, तेव्हा चार प्राण्यांपैकी एक मेघगर्जनेसारख्या ध्वनीने, “ये,”2 असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक ‘पांढरा घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला; त्याच्याजवळ धनुष्य होते, मग त्याला मुकुट देण्यात आला; तो विजय मिळवत मिळवत आणखी विजयावर विजय मिळवण्यास निघून गेला. त्याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसरा प्राणी, “ये”, असे म्हणाला, ते मी ऐकले. तेव्हा दुसरा ‘घोडा’ निघाला; तो ‘अग्निवर्ण’ होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करवण्याचे काम सोपवले होते; त्याला मोठी तलवार देण्यात आली होती. त्याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसरा प्राणी, “ये”, असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक ‘काळा घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला कोणीएक माझ्या दृष्टीस पडला; त्याच्या हातात तराजू होते; आणि जणू काय चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली, ती अशी : “रुपयाला शेरभर गहू, आणि रुपयाला तीन शेर जव; तेल व द्राक्षारस ह्यांची हानी करू नकोस!” त्याने चौथा शिक्का फोडला, तेव्हा चौथा प्राणी, “ये,” असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले, तो एक फिकट रंगाचा ‘घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला पुरुष माझ्या दृष्टीस पडला, त्याचे नाव ‘मृत्यू’; आणि ‘अधोलोक’ त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना ‘तलवारीने, दुष्काळाने, मरीने व पृथ्वीवरील श्वापदांकडून माणसांना जिवे मारण्याचा’ अधिकार पृथ्वीच्या चौथ्या भागावर देण्यात आला.