YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 5:9-14

प्रकटी 5:9-14 MARVBSI

ते ‘नवे गीत गाऊन’ म्हणतात : “तू गुंडाळी घेण्यास व तिचे शिक्के फोडण्यास योग्य आहेस; कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून 1आमच्या ‘देवासाठी’ विकत घेतले आहेत आणि आमच्या देवासाठी त्यांना ‘राज्य’ व ‘याजक’ असे केले आहेस आणि ते पृथ्वीवर राज्य करतील.” तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडील ह्यांच्याभोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली; आणि त्यांची संख्या ‘अयुतांची अयुते व सहस्रांची सहस्रे होती.’ ते मोठ्याने म्हणत होते : “वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान गौरव व धन्यवाद हे घेण्यास योग्य आहे!” आणि स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रावर जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो, आणि त्यांतील सर्व वस्तुजात ह्यांना मी असे म्हणताना ऐकले : “राजासनावर बसलेला ह्याला व कोकर्‍याला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत!” तेव्हा ते चार प्राणी म्हणाले, “आमेन!” आणि चोवीस वडिलांनी [जो सदासर्वकाळ जिवंत आहे त्याला] पाया पडून नमन केले.

प्रकटी 5:9-14शी संबंधित विनामूल्य वाचन योजना आणि भक्ती