YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 4:1-5

प्रकटी 4:1-5 MARVBSI

ह्यानंतर मी पाहिले तो पाहा, स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबरोबर बोलणार्‍या ‘कर्ण्याच्या’ ध्वनीसारखी होती; ती म्हणाली, “इकडे ‘वर ये’ म्हणजे ‘ज्या गोष्टी’ ह्यानंतर ‘घडून आल्या पाहिजेत’ त्या मी तुला दाखवीन.” लगेचच मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा पाहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते, आणि ‘त्या राजासनावर कोणीएक बसलेला होता.’ जो बसलेला होता तो दिसण्यात यास्फे व सार्दि ह्या रत्नांसारखा होता. ‘राजासनाभोवती’ दिसण्यात पाचूसारखे ‘मेघधनुष्य होते.’ राजासनाभोवती चोवीस आसने होती; आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यांवर सोन्याचे मुकुट घातलेले चोवीस वडील बसलेले होते. राजासनाच्या आतून ‘विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या’ आणि पेटलेल्या सात मशाली राजासनापुडे जळत होत्या; त्या देवाचे सात आत्मे आहेत.