नंतर त्याने देवाच्या व कोकर्याच्या राजासनातून ‘निघालेली’ नगरीच्या मार्गावरून वाहणारी ‘जीवनाच्या पाण्याची’ स्फटिकासारखी नितळ ‘नदी’ मला दाखवली. नदीच्या ‘दोन्ही बाजूंना’ बारा जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते ‘दर महिन्यास आपली फळे’ देते आणि त्या झाडाची ‘पाने’ राष्ट्रांच्या ‘आरोग्यासाठी’ उपयोगी पडतात. ‘पुढे काहीही शापित असणार नाही;’ तर तिच्यामध्ये देवाचे व कोकर्याचे राजासन असेल; आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. ‘ते त्याचे मुख पाहतील’ व त्याचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल. पुढे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा ‘सूर्याच्या प्रकाशाची’ गरज नाही; कारण प्रभू देव त्यांच्यावर ‘प्रकाश पाडील; आणि ते युगानुयुग राज्य करतील.’
प्रकटी 22 वाचा
ऐका प्रकटी 22
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रकटी 22:1-5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ