YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 21:9-14

प्रकटी 21:9-14 MARVBSI

नंतर शेवटल्या ‘सात पीडांनी’ भरलेल्या सात वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा सात देवदूतांपैकी एक देवदूत येऊन माझ्याबरोबर बोलला; तो म्हणाला, “ये, नवरी म्हणजे कोकर्‍याची स्त्री मी तुला दाखवतो.” तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने ‘मला’ मोठ्या ‘उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम’ देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली. तिच्या ठायी ‘देवाचे तेज’ होते; तिची कांती अति मोलवान रत्नासारखी होती; ती स्फटिकाप्रमाणे लखलखणार्‍या यास्फे खड्यासारखी होती; तिला मोठा उंच तट होता; त्याला बारा ‘वेशी’ होत्या, आणि वेशींजवळ बारा देवदूत होते. त्या वेशींवर ‘नावे’ लिहिलेली होती; ती ‘इस्राएलाच्या संतानाच्या’ बारा ‘वंशांची’ होती. ‘पूर्वेकडे तीन वेशी; उत्तरेकडे तीन वेशी; दक्षिणेकडे तीन वेशी; व पश्‍चिमेकडे तीन वेशी होत्या.’ नगरीच्या तटाला बारा पाये होते, त्यांच्यावर कोकर्‍याच्या बारा प्रेषितांची बारा नावे होती.