‘नंतर’ मोठे पांढरे ‘राजासन’ व त्यावर ‘बसलेला’ एक जण ‘माझ्या दृष्टीस पडला;’ त्याच्या ‘तोंडापुढून पृथ्वी’ व आकाश हे ‘पळाले; त्यांकरता ठिकाण उरले नाही.’ मग मृत झालेल्या लहानथोरांना मी [देवाच्या] राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्या वेळी ‘पुस्तके उघडली गेली;’ तेव्हा दुसरे एक ‘पुस्तक’ उघडले गेले ते ‘जीवनाचे’ होते; आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ‘ज्यांच्या-त्यांच्या कृत्यांप्रमाणे’ ठरवण्यात आला. तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत माणसांना बाहेर सोडले; मृत्यू व अधोलोक ह्यांनी आपल्यातील मृतांना बाहेर सोडले; आणि ‘ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे’ प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. ज्या कोणाचे नाव ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही’ तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला.
प्रकटी 20 वाचा
ऐका प्रकटी 20
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रकटी 20:11-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ