तेव्हा ‘जणू काय’ मोठ्या ‘समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनी’ व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला; तो म्हणाला, “‘हालेलूया; कारण’ सर्वसमर्थ आमचा ‘प्रभू’ देव ह्याने ‘राज्य हाती घेतले आहे. आपण आनंद’ व ‘उल्लास करू’ व त्याचा गौरव करू; कारण कोकर्याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे, तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहे;” ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत. तेव्हा तो मला म्हणाला, “हे लिही की, कोकर्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य.” तो मला असेही म्हणाला, “ही देवाची सत्यवचने आहेत.”
प्रकटी 19 वाचा
ऐका प्रकटी 19
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रकटी 19:6-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ