YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 98:1-9

स्तोत्रसंहिता 98:1-9 MARVBSI

परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने स्वत:साठी विजय साधला आहे. परमेश्वराने आपला विजय विदित केला आहे; राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे. त्याने इस्राएलाच्या घराण्यावरील आपली दया व आपली सत्यता ह्यांचे स्मरण केले आहे; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने, आनंदाने गा; त्याची स्तोत्रे गा. परमेश्वराचे गुणगान वीणेवर करा, वीणेवर सुस्वर स्तोत्र गा. कर्णा व शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा. समुद्र व त्यातील सर्वकाही, जग व त्यात राहणारे हर्षनाद करोत. नद्या टाळ्या वाजवोत; पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावोत; कारण तो पृथ्वीचा न्याय करण्यास आला आहे; तो जगाचा न्याय यथार्थतेने करील, व लोकांचा न्याय सरळपणे करील.