YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 93

93
परमेश्वराचे माहात्म्य
1परमेश्वर राज्य करतो, त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे; परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर कसली आहे; म्हणून पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही.
2तुझे राजासन पुरातन कालापासून स्थिर आहे; तू अनादि कालापासून आहेस.
3हे परमेश्वरा, नद्यांनी कल्लोळ केला आहे, महानाद केला आहे; नद्यांनी आपल्या लाटांनी गर्जना केली आहे.
4विपुल जलांच्या, महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्च स्थानी असलेला परमेश्वर प्रतापशाली आहे.
5तुझे निर्बंध अभंग आहेत; हे परमेश्वरा, तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभते.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 93: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन