YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 89:1-29

स्तोत्रसंहिता 89:1-29 MARVBSI

परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन; मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्यांना तुझी सत्यता कळवीन. कारण मी म्हणालो, तुझ्या दयेची उभारणी सदोदित राहील; स्वर्गात तुझी सत्यता तूच स्थापली आहेस. “मी आपल्या निवडलेल्या पुरुषाशी करार केला आहे; मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे : ‘मी तुझ्या संततीची परंपरा सर्वकाळ चालवीन, तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थिर स्थापीन;” (सेला) हे परमेश्वरा, तुझ्या अद्भुत कृतींची स्तुती आकाश करील; तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्र जनांच्या मंडळीत होईल. कारण परमेश्वराशी तुलना करता येईल असा आकाशात कोण आहे? देवदूतांमध्ये परमेश्वरासमान कोण आहे? पवित्र जनांच्या सभेत भीती बाळगण्यास योग्य असा देव तो आहे; त्याच्या सभोवतालच्या सर्वांपेक्षा तो भीतिप्रद आहे. हे सेनाधीश देवा, परमेश्वरा, हे परमेशा, तुझ्यासारखा समर्थ कोण आहे? तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे. समुद्राच्या खळबळाटावर तू अधिकार चालवतोस; तो उचंबळतो तेव्हा त्याच्या लाटा तू शांत करतोस. तू राहाबाला1 ठेचून ठार केले आहेस; तू आपल्या बाहुबलाने आपल्या शत्रूंची दाणादाण केली आहेस. आकाश तुझे आहे, पृथ्वीही तुझी आहे; जग व त्यातले सर्वकाही तूच स्थापले आहेस. उत्तर व दक्षिण ह्या तू उत्पन्न केल्यास; ताबोर व हर्मोन तुझ्या नावाचा जयजयकार करतात. तुझा भुज पराक्रमी आहे; तुझा हात बळकट आहे, तुझा उजवा हात उभारलेला आहे. नीती व न्याय ही तुझ्या राजासनाचा पाया आहेत; दया व सत्य तुझे सेवक आहेत. ज्या लोकांना उत्साहशब्दाचा परिचय आहे ते धन्य! हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात. ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्लास करतात; तुझ्या न्यायपरायणतेने त्यांची उन्नती होते. कारण त्यांच्या बलाचे वैभव तू आहेस; तुझ्या प्रसादाने आमचा उत्कर्ष होत राहील.2 आमची ढाल परमेश्वराच्या मालकीची आहे; आमचा राजाही इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा आहे. पूर्वी तू आपल्या भक्तांशी दृष्टान्ताने बोललास; तू म्हणालास, “मी एका वीराकडे साहाय्य करण्याचे सोपवले आहे; लोकांतून निवडलेल्या एकाला मी श्रेष्ठ पदास चढवले आहे. माझा सेवक दावीद मला मिळाला आहे; मी आपल्या पवित्र तेलाने त्याला अभिषेक केला आहे. त्याच्याबरोबर माझा हात सदा राहील. माझा भुजही त्याला बलवान करील. शत्रू त्याला छळणार नाहीत; दुष्ट जन त्याला पीडा देणार नाहीत. मी त्याच्यादेखत त्याच्या शत्रूंना मारून चीत करीन. त्याच्या द्वेष्ट्यांना मारून टाकीन. माझी सत्यता व माझी दया त्याच्यासोबत राहतील; माझ्या नावाने त्याचा उत्कर्ष होईल3 मी त्याचा हात समुद्रावर, आणि त्याचा उजवा हात नद्यांवर ठेवीन. तो माझा धावा करून म्हणेल, ‘तू माझा पिता, माझा देव, माझा तारणाचा दुर्ग आहेस. मी तर त्याला ज्येष्ठ करीन. पृथ्वीवरील राजांत त्याला सर्वश्रेष्ठ करीन. मी आपली दया त्याच्यावर सर्वकाळ कायम राखीन, त्याच्याशी केलेला माझा करार अढळ राहील. त्याची संतती सर्वकाळ राहील, व त्याचे राजासन स्वर्गाच्या दिवसांप्रमाणे अक्षय राहील असे करीन.