YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 46:2-7

स्तोत्रसंहिता 46:2-7 MARVBSI

म्हणून पृथ्वी उलथीपालथी झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले, सागराच्या लाटा गर्जून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हालले तरी आम्ही भिणार नाही. (सेला) जिचे प्रवाह देवाच्या नगरीला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात अशी एक नदी आहे. त्या नगरीच्या ठायी देव आहे; ती ढळावयाची नाही; प्रभात होताच देव तिला साहाय्य करील. राष्ट्रे खवळली, राज्ये डळमळली; त्याने गर्जना केली तो पृथ्वी विरघळून गेली. सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. (सेला)