YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 42:1-4

स्तोत्रसंहिता 42:1-4 MARVBSI

हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी लुलपते तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे; मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन? “तुझा देव कोठे आहे?” असे ते मला सतत म्हणतात, म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. लोकसमुदाय सण पाळीत असे तेव्हा त्यांच्या मेळ्याबरोबर मी कसा चाले; आणि आनंदोत्सव व देवस्तवन ह्यांचा गजर चालला असता देवाच्या घराकडे त्यांना मी कसा मिरवत नेई, हे आठवून माझ्या जिवाचे पाणी पाणी होते.