YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 39:1-5

स्तोत्रसंहिता 39:1-5 MARVBSI

मी म्हणालो की, “मी आपल्या जिभेने पाप करू नये म्हणून आपल्या चालचलणुकीस जपेन; माझ्यासमोर दुर्जन आहे तोपर्यंत मी आपल्या तोंडाला लगाम घालून ठेवीन.” मौन धरून मी गप्प राहिलो, बरेदेखील काही बोललो नाही, तरी माझ्या दु:खाने उचल खाल्ली. माझे हृदय आतल्या आत संतप्त झाले; मला ध्यास लागला असता माझ्यामध्ये अग्नी भडकला, तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो; “हे परमेश्वरा, माझा अंतकाळ केव्हा आहे, व माझे आयुष्यमान किती आहे, हे मला समजू दे; म्हणजे मी किती नश्वर आहे हे मला कळेल. पाहा, तू माझे दिवस वीतभर केले आहेत; माझ्या आयुष्याचा काळ तुझ्यापुढे काही नाही; एखादा मनुष्य कितीही खंबीर असला तरी तो श्वासरूपच होय, हे खास. (सेला)