YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 30:1-5

स्तोत्रसंहिता 30:1-5 MARVBSI

हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू माझा उद्धार केला आहेस; तू माझ्या वैर्‍यांना माझ्यामुळे हर्ष करू दिला नाहीस. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केलेस. हे परमेश्वरा, तू माझा जीव अधोलोकातून वर काढलास; गर्तेत पडलेल्यांमधून तू मला जिवंत राखलेस. अहो परमेश्वराचे भक्तहो, त्याचे गुणगान गा; आणि त्याच्या पावित्र्याचे स्मरण करताना त्याचा धन्यवाद करा. त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो; त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो; रात्री विलापाने बिर्‍हाड केले तरी प्रात:काळी हर्षध्वनी होतो.