YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 29:1-11

स्तोत्रसंहिता 29:1-11 MARVBSI

अहो दिव्यदूतहो,1 परमेश्वराला श्रेय द्या, परमेश्वराला गौरव व सामर्थ्य ह्यांचे श्रेय द्या. परमेश्वराला त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या; पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. परमेश्वराचा ध्वनी जलांमधून चढत आहे; प्रतापशाली देव गर्जना करीत आहे; परमेश्वर जलाशयांवर आहे. परमेश्वराचा ध्वनी प्रबल आहे; परमेश्वराचा ध्वनी प्रतापमय आहे. परमेश्वराचा ध्वनी देवदारू मोडतो; परमेश्वर लबानोनाच्या देवदारूंचा चक्काचूर करतो. तो त्यांना वासराप्रमाणे उसळायला लावतो; लबानोन व शिर्योन ह्यांना रानबैलाच्या वत्साप्रमाणे उसळायला लावतो. परमेश्वराचा ध्वनी अग्निज्वाला भेदतो. परमेश्वराचा ध्वनी वने कंपायमान करतो; परमेश्वर कादेशचे वन कंपित करतो. परमेश्वराचा ध्वनी हरिणींना गर्भ गाळण्यास लावतो आणि वनवृक्ष पर्णहीन करतो; त्याच्या मंदिरात सर्वत्र “महिमा! महिमा!” असा ध्वनी दुमदुमतो. परमेश्वर जलप्रलयावर आरूढ होतो; परमेश्वर राजासनावर सर्वकाळ बसलेला आहे. परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य देईल; परमेश्वर आपल्या लोकांना शांतीचे वरदान देईल.