YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 27:7-14

स्तोत्रसंहिता 27:7-14 MARVBSI

मी उच्च स्वराने तुझा धावा करत आहे, हे परमेश्वरा, ऐक; माझ्यावर दया कर, माझी याचना ऐक. “माझे दर्शन घ्या,” असे तू म्हटले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, “हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे.” तू आपले मुख माझ्या दृष्टिआड करू नकोस आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नकोस. तू माझे साहाय्य होत आला आहेस; हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नकोस, मला सोडू नकोस. माझ्या आईबापांनी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करील. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव; लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने. माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपवू नकोस. कारण खोटे साक्षीदार व निष्ठुरपणाचे फूत्कार टाकणारे माझ्यावर उठले आहेत. ह्या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खातरीने माझे कल्याण करील. परमेश्वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर; परमेश्वराचीच प्रतीक्षा कर.