त्याने वरून हात लांब करून मला धरले, आणि मोठ्या जलाशयातून मला बाहेर काढले. माझा बलाढ्य वैरी व माझे द्वेष्टे ह्यांच्या हातून मला त्याने सोडवले, कारण ते माझ्यापेक्षा अति बलिष्ठ होते. माझ्या विपत्काली ते माझ्यावर चालून आले तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला. त्याने मला प्रशस्त स्थली बाहेर आणले; तो माझ्याविषयी संतुष्ट होता म्हणून त्याने मला सोडवले. परमेश्वराने माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे मला फळ दिले; माझ्या हातांच्या निर्मलतेप्रमाणे त्याने मला प्रतिफळ दिले. कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो, मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही. त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत, मी त्याच्या विधींचा त्याग केला नाही. मी त्याच्या दृष्टीने सात्त्विकतेने वागत असे आणि मी अनीतीपासून स्वतःला अलिप्त राखले. म्हणून परमेश्वराने माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे, त्याच्या नजरेस आलेल्या माझ्या हातांच्या निर्मलतेप्रमाणे, मला प्रतिफळ दिले. दयावंताशी तू दयेने वागतोस, सात्त्विकाशी सात्त्विकतेने वागतोस; शुद्धांशी तू शुद्ध भावनेने वागतोस, कुटिलांशी तू कुटिलतेने वागतोस, दीन जनांना तू तारतोस, उन्मत्त दृष्टीच्या लोकांना नीच करतोस; तू माझा दीप उजळतोस; परमेश्वर माझा देव, माझ्या अंधकाराचा प्रकाश करतो. तुझ्या साहाय्याने मी फौजेवर चाल करून धावत जातो, माझ्या देवाच्या साहाय्याने मी तट उडून जातो. देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग परिपूर्ण आहे; परमेश्वराचे वचन कसास उतरले आहे; त्यांचा आश्रय करणार्या सर्वांची तो ढाल आहे. परमेश्वरावाचून देव कोण आहे? आमच्या देवाशिवाय दुर्ग कोण आहे? तोच देव मला सामर्थ्याचा कमरबंद बांधतो, तो माझा मार्ग निर्वेध करतो. तो माझे पाय हरिणींच्या पायांसारखे करतो, आणि उंच जागांवर माझी स्थापना करतो. तो माझ्या हातांना युद्धकला शिकवतो, म्हणून माझे दंड पितळी धनुष्य वाकवतात. तू मला आपली तारणरूपी ढाल दिली आहेस; आपल्या उजव्या हाताने मला उचलून धरले आहेस; तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे. तू माझ्या पावलांसाठी प्रशस्त जागा केली आहेस, माझे पाय घसरले नाहीत.
स्तोत्रसंहिता 18 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 18
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 18:16-36
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ