YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 149:1-9

स्तोत्रसंहिता 149:1-9 MARVBSI

परमेशाचे स्तवन करा!1 नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा. भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा. इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो; सीयोनेची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावोत. ती नृत्य करीत त्याच्या नावाचे स्तवन करोत. डफ व वीणा ह्यांवर त्याला स्तोत्रे गावोत. कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे; तो दीनांना तारणाने सुशोभित करतो. भक्त गौरवामुळे उल्लासोत; ते आपल्या अंथरुणांवरून हर्षघोष करोत. परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो; दुधारी तलवार त्यांच्या हाती असो; तिच्या योगे राष्ट्रांचा सूड त्यांनी उगवावा आणि लोकांना शासन करावे. त्यांच्या राजांना साखळदंडांनी बांधावे आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्या घालाव्यात. लिहून ठेवलेला निवाडा त्यांच्यावर बजवावा, हे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल. परमेशाचे स्तवन करा!1