YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 146:1-7

स्तोत्रसंहिता 146:1-7 MARVBSI

परमेशाचे स्तवन करा!1 हे माझ्या जिवा, परमेश्वराचे स्तवन कर. माझ्या जिवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन; मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो. ज्याच्या साहाय्यासाठी याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्याच्यावर आहे, तो धन्य! त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्वकाही निर्माण केले; तो सदा आपले सत्यवचन पाळतो. तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो; भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो.