परमेशाचे स्तवन करा!1 हे माझ्या जिवा, परमेश्वराचे स्तवन कर. माझ्या जिवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन; मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो. ज्याच्या साहाय्यासाठी याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्याच्यावर आहे, तो धन्य!
स्तोत्रसंहिता 146 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 146
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 146:1-5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ