YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 141:1-5

स्तोत्रसंहिता 141:1-5 MARVBSI

हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो; माझ्याकडे सत्वर ये; मी तुझा धावा करतो तेव्हा माझ्या वाणीकडे कान दे. माझी प्रार्थना तुझ्यासमोर धूपाप्रमाणे माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो. हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव; माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. अनीती करणार्‍या मनुष्यांबरोबर मी दुराचरण करू नये म्हणून माझे मन कोणत्याही वाईट गोष्टीकडे वळू देऊ नकोस; आणि मला त्यांची मिष्टान्ने खाऊ देऊ नकोस. नीतिमान मला ताडन करो. तो मला बोल लावो, तरी ती दयाच होईल. तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही; कारण दुर्जनांनी दुष्टाई केली तरी मी प्रार्थना करीत राहीन.