स्तोत्रसंहिता 137
137
बाबेलमध्ये पाडाव करून नेलेल्यांचा आकांत
1बाबेलच्या नद्यांजवळ आम्ही बसलो; हो, तेथे आम्हांला सीयोनेची आठवण झाली; तेव्हा आम्ही रडलो.
2तेथील वाळुंजांवर आम्ही आपल्या वीणा टांगून ठेवल्या,
3कारण तेथे आमचा पाडाव करणार्यांनी आम्हांला गाणी गायला सांगितले आमचा छळ करणार्यांनी आम्हांला त्यांची करमणूक करण्यास सांगितले. ते म्हणाले, “आम्हांला सीयोनेचे एखादे गाणे गाऊन दाखवा.”
4आम्ही परक्या स्थळी परमेश्वराचे गाणे कसे गावे?
5हे यरुशलेमे, जर मी तुला विसरलो तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो.
6जर मी तुझी आठवण ठेवली नाही, जर मी यरुशलेमेला माझ्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानले नाही, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.
7हे परमेश्वरा, अदोमी लोकांविरुद्ध यरुशलेमेच्या त्या दिवसाची आठवण ठेव; ते म्हणाले, “ती पाडून टाका, पायापर्यंत जमीनदोस्त करा.”
8हे बाबेलच्या कन्ये, तू ओसाड पडणार आहेस; तू आमच्याशी केलेल्या वर्तनांबद्दल जो तुझे पारिपत्य करील तो धन्य!
9जो तुझी बाळके धरून खडकावर आपटील तो धन्य!
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 137: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.