YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 136:1-9

स्तोत्रसंहिता 136:1-9 MARVBSI

परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; कारण त्याची दया सनातन आहे. देवाधिदेवाचे उपकारस्मरण करा; कारण त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूचे उपकारस्मरण करा; कारण त्याची दया सनातन आहे. जो एकटाच मोठी अद्भुत कृत्ये करतो त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने बुद्धिचातुर्याने आकाश केले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने पृथ्वी जलांवर विस्तारली त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्य निर्माण केला त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.