YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 119:49-56

स्तोत्रसंहिता 119:49-56 MARVBSI

तू आपल्या दासाला दिलेले वचन आठव, कारण तू मला आशा लावली आहेस. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते. गर्विष्ठांनी माझा फार उपहास केला, तरी मी तुझ्या नियमशास्त्रापासून बहकलो नाही. हे परमेश्वरा, तुझे पुरातन निर्णय आठवून माझे समाधान झाले आहे. दुर्जन तुझ्या नियमशास्त्राचा त्याग करतात, म्हणून मला फार संताप येतो. माझ्या संसारयात्रेत तुझे नियम मला गीतरूप झाले आहेत. हे परमेश्वरा, मी रात्री तुझ्या नावाचे स्मरण केले आहे. आणि तुझे नियमशास्त्र पाळले आहे. मी तुझे विधी आचरले आहेत म्हणून मला हे प्राप्त झाले आहे.