उत्सवाचा व तारणाचा शब्द नीतिमानांच्या वस्तीत आहे; “परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे; परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो.” मी मरणार नाही, तर जगेन, आणि परमेशाच्या कृत्यांचे वर्णन करीन. परमेशाने मला जबर शासन केले; तरी मला मृत्यूच्या हवाली केले नाही. माझ्यासाठी नीतिमत्त्वाची द्वारे उघडा म्हणजे मी त्यांतून प्रवेश करून परमेशाचे उपकारस्मरण करीन. हे परमेश्वराचे द्वार आहे; ह्यातून नीतिमान प्रवेश करोत तू माझे ऐकले आहे, तू माझे तारण झाला आहेस, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो. बांधणार्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. ही परमेश्वराची करणी आहे; ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे. ह्यात आपण उल्लास व आनंद करू. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की, आमचे तारण कर. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की, आमचा उत्कर्ष कर. परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. परमेश्वराच्या घरातून आम्ही तुम्हांला आशीर्वाद देतो. परमेश्वर देव आहे, त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे. उत्सवाचा यज्ञपशू वेदीच्या शिंगांना दोर्यांनी बांधा. तू माझा देव आहेस; मी तुझे उपकारस्मरण करीन; हे माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन. परमेश्वराचे उपकारस्मरण करा; कारण तो चांगला आहे. कारण त्याची दया सनातन आहे.
स्तोत्रसंहिता 118 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 118
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 118:15-29
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ