YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 118:15-24

स्तोत्रसंहिता 118:15-24 MARVBSI

उत्सवाचा व तारणाचा शब्द नीतिमानांच्या वस्तीत आहे; “परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे; परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो.” मी मरणार नाही, तर जगेन, आणि परमेशाच्या कृत्यांचे वर्णन करीन. परमेशाने मला जबर शासन केले; तरी मला मृत्यूच्या हवाली केले नाही. माझ्यासाठी नीतिमत्त्वाची द्वारे उघडा म्हणजे मी त्यांतून प्रवेश करून परमेशाचे उपकारस्मरण करीन. हे परमेश्वराचे द्वार आहे; ह्यातून नीतिमान प्रवेश करोत तू माझे ऐकले आहे, तू माझे तारण झाला आहेस, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो. बांधणार्‍यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. ही परमेश्वराची करणी आहे; ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे. ह्यात आपण उल्लास व आनंद करू.