YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 106:43-48

स्तोत्रसंहिता 106:43-48 MARVBSI

अनेक वेळा त्याने त्यांना मुक्त केले तरी ते आपला हेका न सोडता बंडखोरच राहिले, व आपल्या अनीतीने अधोगतीस पोहचले. तथापि त्यांची आरोळी ऐकून परमेश्वराने त्यांच्या संकटाकडे दृष्टी लावली; त्याने आपल्या कराराचे स्मरण त्यांच्यासाठी करून आपल्या अपार दयेने त्यांची कीव केली. त्यांचा पाडाव करणार्‍या सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी त्याने दया उत्पन्न केली. हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हांला तार, आम्हांला राष्ट्रांतून काढून एकवट कर, म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे स्तवन करू, तुझ्या स्तवनात आम्हांला उल्लास वाटेल. इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा अनादि कालापासून अनंतकालपर्यंत धन्यवाद होवो. सर्व लोक “आमेन” म्हणोत. परमेशाचे स्तवन करा!1