YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 106:24-35

स्तोत्रसंहिता 106:24-35 MARVBSI

त्यांनी रम्य देश तुच्छ मानला; त्यांनी त्याच्या वचनांवर विश्वास ठेवला नाही. त्यांनी आपल्या तंबूत कुरकुर केली. परमेश्वराचा शब्द मानला नाही. तेव्हा त्याने आपला हात वर करून त्यांच्याविषयी शपथ वाहिली की, मी त्यांना रानात खाली पाडीन, त्यांची संतती राष्ट्रांत विखरीन, त्यांना देशोधडीस लावीन. ते पौर येथील बआल ह्या दैवतावर आसक्त झाले; त्यांनी निर्जीव मूर्तींना वाहिलेले बळी खाल्ले. त्यांनी आपल्या कृत्यांनी त्याला क्रोध आणला म्हणून त्यांच्यामध्ये पटकी सुरू झाली. तेव्हा फीनहासाने पुढे होऊन मध्यस्थी केली; आणि पटकी बंद झाली. हे त्याला नीतिमत्त्व असे पिढ्यानपिढ्या सर्वकाळ गणण्यात आले. मरीबा येथील जलाजवळही त्यांनी त्याला संताप आणला, आणि त्यांच्यामुळे मोशेवर अरिष्ट आले; कारण त्यांनी त्याच्या आत्म्याला विरोध केला, आणि त्याने अविचाराचे शब्द तोंडातून काढले. परमेश्वराच्या आज्ञेचे त्यांनी उल्लंघन केले, म्हणजे त्यांनी इतर राष्ट्रांचा विध्वंस केला नाही, तर ते त्या राष्ट्रांत मिसळले, आणि त्यांचे आचार शिकले