YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 10:2-6

स्तोत्रसंहिता 10:2-6 MARVBSI

दुर्जनांच्या गर्वामुळे दीन दुःखाने होरपळून जातो; ज्या क्लृप्त्या ते योजतात त्यांतच ते सापडोत. कारण दुर्जन आपल्या मनातील हावेची शेखी मिरवतो; लोभिष्ट मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानतो. दुर्जन नाक वर करून म्हणतो, “तो झडती घेणार नाही;” “देव नाही” असेच त्याचे सर्व विचार असतात. त्याच्या युक्त्या सर्वदा सिद्धीस जातात; तुझे निर्णय त्याच्या अगदी दृष्टीपलीकडे उच्च असे असतात; तो आपल्या सर्व शत्रूंवर फूत्कार टाकतो. तो आपल्या मनात म्हणतो की, “मी ढळणार नाही, मी पिढ्यानपिढ्याही विपत्तीत पडणार नाही.”