ज्ञान घोषणा करीत नाही काय? सुज्ञपण आपल्या वाणीची गर्जना करीत नाही काय? मार्गावरील उंचवट्यांच्या शिखरांवर, चवाठ्यांवर ते उभे असते; ते वेशीनजीक, नगराच्या तोंडी प्रवेशद्वारी मोठ्याने ओरडून म्हणते, “मानवहो, मी तुम्हांला हाका मारीत आहे; मनुष्यजातीसाठी माझी वाणी आहे. अहो भोळ्यांनो, तुम्ही चातुर्याची ओळख करून घ्या; मूर्खांनो, सुबुद्ध हृदयाचे व्हा. ऐका, कारण मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे. माझ्या वाणीतून सरळ गोष्टी निघणार आहेत. माझे तोंड सत्य बोलते; माझ्या वाणीला दुष्टपणाचा वीट आहे. माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत; त्यांत काही वाकडे व विपरीत नाही. ज्याला समज आहे त्याला ती सर्व उघड आहेत; ती ज्ञान प्राप्त झालेल्यांना सरळ आहेत रुपे घेऊ नका तर माझे शिक्षण घ्या; उत्कृष्ट सोने न घेता ज्ञान घ्या. कारण मोत्यांपेक्षा ज्ञान उत्तम आहे; सर्व इष्ट वाटणार्या वस्तू त्याच्याशी तुल्य नाहीत; मी जे ज्ञान त्या माझी वस्ती चातुर्याबरोबर आहे; आणि विद्या व विवेक ही मी प्राप्त करून घेतली आहेत. परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय; गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी ह्यांचा मी द्वेष करते. मसलत व कार्यसिद्धी ही माझी आहेत; मी सुज्ञतामय आहे; मला सामर्थ्य आहे. माझ्या साहाय्याने राजे राज्य करतात. अधिपती न्याय ठरवतात. माझ्या साहाय्याने अधिपती, सरदार, व पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश अधिकार चालवतात. माझ्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते; जे मला परिश्रमाने शोधतात त्यांना मी सापडते. संपत्ती व मान, टिकणारे धन व न्यायत्व, ही माझ्या हाती आहेत. माझे फळ सोन्यापेक्षा, शुद्ध सोन्यापेक्षा उत्तम आहे; माझी प्राप्ती उत्कृष्ट रुप्यापेक्षा उत्तम आहे. मी नीतिमार्गाने, न्यायाच्या वाटांनी चालते; माझ्यावर प्रीती करणार्यांना मी संपत्ती प्राप्त करून देते, त्यांची भांडारे भरते. परमेश्वराने सृष्टिक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यांतील पहिले कृत्य, असे मला निर्माण केले.
नीतिसूत्रे 8 वाचा
ऐका नीतिसूत्रे 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 8:1-22
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ