ज्याप्रमाणे पारध्याच्या हातून हरिणीला, ज्याप्रमाणे फासेपारध्याच्या हातून पक्ष्याला, त्याप्रमाणे आपणाला मुक्त करून घे. अरे आळशा, मुंगीकडे जा; तिचे वर्तन पाहून शहाणा हो; तिला कोणी धनी, देखरेख करणारा किंवा अधिपती नसता ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते, आणि कापणीच्या दिवसांत आपले भक्ष्य जमा करून ठेवते. अरे आळशा, तू किती वेळ निजशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो, आणखी हात उराशी धरून निजतो. असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे, आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील.
नीतिसूत्रे 6 वाचा
ऐका नीतिसूत्रे 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 6:5-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ