YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 6:23-29

नीतिसूत्रे 6:23-29 MARVBSI

कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे व ती शिस्त केवळ प्रकाश आहे. बोधाचे वाग्दंड जीवनाचा मार्ग आहे; दुष्ट स्त्रीपासून, परस्त्रीच्या गोडबोल्या जिव्हेपासून, ती तुझे रक्षण करणारी आहेत. तू आपले चित्त तिच्या सौंदर्यास पाहून लोलुप होऊ देऊ नकोस; तिच्या नेत्रकटाक्षांना वश होऊ नकोस. कारण व्यभिचारिणीच्या संगतीने मनुष्य भाकरीच्या तुकड्याला मोताद होतो; स्वैरिणी स्त्री पुरुषाच्या अमोल जिवाची शिकार करते. मनुष्याने आपल्या उराशी विस्तव धरला तर त्याची वस्त्रे जळणार नाहीत काय? कोणी निखार्‍यावर चालला तर त्याचे पाय पोळणार नाहीत काय? जो कोणी आपल्या शेजार्‍याच्या स्त्रीशी गमन करतो तो असा आहे; जो कोणी तिला स्पर्श करतो तो निर्दोष असणार नाही.