YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 29:15-27

नीतिसूत्रे 29:15-27 MARVBSI

छडी व वाग्दंड ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले पोर आपल्या आईला खाली पाहायला लावते. दुर्जन बढती पावले म्हणजे गुन्हे वाढतात, नीतिमानांना त्यांचे पतन पाहायला सापडते. तू आपल्या मुलाला शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जिवाला हर्ष देईल. ईश्वरी दृष्टान्त न झाल्यास लोक अनावर होतात, पण नियमशास्त्र पाळतो तो धन्य. चाकर शब्दांनी सुधारत नाही; त्याला समजते तरी तो पर्वा करीत नाही. बोलण्यात उतावळा असा कोणी तुला दिसतो काय? त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा असते. कोणी आपल्या चाकराला बाळपणापासून लाडाने वाढवले, तर तो शेवटी मुलगाच1 होऊन बसेल. रागीट मनुष्य तंटा उपस्थित करतो, क्रोधाविष्ट मनुष्याकडून बहुत अपराध घडतात. गर्व मनुष्याला खाली उतरवतो, पण ज्याचे चित्त नम्र तो सन्मान पावतो. चोराचा भागीदार आपल्या आत्म्याचा द्वेष्टा होय; तो शपथ ऐकतो तरी काही सांगत नाही. मनुष्याची भीती पाशरूप होते; पण जो परमेश्वरावर भाव ठेवतो त्याचे संरक्षण होते. अधिपतीची मर्जी संपादण्यास पुष्कळ लोक झटतात; पण मनुष्याचा निवाडा करणारा परमेश्वर आहे. कुटिल मनुष्याचा नीतिमानांना वीट वाटतो, आणि सरळमार्गी मनुष्याचा दुर्जनाला वीट वाटतो.