पुष्कळदा वाग्दंड झाला असूनही जो आपली मान ताठ करतो, त्याचा अचानक चुराडा होतो, त्याचा काही उपाय चालत नाही नीतिमान बढती पावतात तेव्हा लोक आनंद पावतात, पण दुर्जन प्रभुत्व चालवतो तेव्हा प्रजा हायहाय करते. ज्या मनुष्याला ज्ञानाची आवड असते तो आपल्या बापाला आनंदित करतो, पण वेश्यांची संगत धरणारा आपल्या मालमत्तेची धूळधाण करतो. राजा न्यायाने देश सुस्थितीत ठेवतो, पण नजराणे घेणारा त्याचे वाटोळे करतो. जो आपल्या शेजार्याची खुशामत करतो तो त्याच्या पावलांसाठी जाळे पसरतो. दुर्जनांचे पाप पाशरूप आहे, पण नीतिमान स्तवन करून उल्लासतो. नीतिमान गरिबांच्या वादात मन घालतो; दुर्जनाला तो समजण्याची बुद्धी नसते. उद्दामपणा करणारे नगराला आग लावून देतात, पण सुज्ञ जन क्रोधाला घालवतात. सुज्ञाचा मूर्खाशी वाद असला तर मूर्ख रागावो किंवा हसो, त्याला स्वस्थता म्हणून नसतेच. खुनशी माणसे सात्त्विकाचा द्वेष करतात, पण सरळ माणसे त्याच्या जिवाला जपतात. मूर्ख आपल्या मनातील सर्व क्रोध व्यक्त करतो, पण सुज्ञ तो मागे आवरून ठेवतो. अधिपती खोट्या गोष्टीला कान देणारा असला, तर त्याचे सर्व सेवक दुष्ट बनतात. गरीब व सावकार ह्यांचा व्यवहार होतो; ह्या दोघांना प्रकाश देणारा परमेश्वर आहे. जो राजा गरिबांचा खरेपणाने न्याय करतो, त्याचे सिंहासन सदा टिकते.
नीतिसूत्रे 29 वाचा
ऐका नीतिसूत्रे 29
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 29:1-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ