कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात. देशाच्या पातकामुळे त्याचे बहुत अधिपती होतात, पण समंजस व जाणत्या माणसांच्या हातून त्याची सुस्थिती दीर्घकाळ राहते. दुबळ्यांना पिडणारा दरिद्री पुरुष, हा धुऊन नेणार्या व अन्न राहू न देणार्या पावसासारखा आहे. शास्त्राज्ञा मोडणारे दुर्जनांची प्रशंसा करतात, पण नियमशास्त्र पाळणारे त्यांच्यावर संतापतात. दुर्जनांना न्याय समजत नाही, पण परमेश्वराला शरण जाणार्यांना सर्वकाही समजते. धनवान असून जो दुटप्पी मनाचा आहे, त्याच्यापेक्षा सात्त्विकपणे चालणारा दरिद्री बरा. सुज्ञ पुत्र नियमशास्त्र पाळतो, पण खादाडांचा सोबती आपल्या बापास खाली पाहायला लावतो. जो आपले धन वाढीदिढीने वाढवतो, तो ते गरिबांवर दया करण्यासाठी साठवतो. नियमशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थनादेखील वीट आणणारी आहे. जो सरळांना बहकावून कुमार्गाला लावतो तो आपण खणलेल्या खाचेत स्वत: पडेल; पण सात्त्विक कल्याणरूप वतन पावतील. धनवान आपल्या मते शहाणा असतो, पण समंजस गरीब त्याचा भेद बाहेर काढतो. नीतिमानांचा विजय होतो तेव्हा मोठा उत्सव होतो, पण दुर्जन प्रबल झाले असता लोक लपून बसतात. जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही; जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. जो नेहमी पापभीरू असतो तो धन्य, पण जो आपले मन कठीण करतो तो विपत्तीत पडतो.
नीतिसूत्रे 28 वाचा
ऐका नीतिसूत्रे 28
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 28:1-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ