YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 27:1-14

नीतिसूत्रे 27:1-14 MARVBSI

उद्याची खातरी मानू नकोस, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही. स्वमुखाने नव्हे, तर इतरांनी, आपल्या तोंडाने नव्हे तर परक्यांनी तुझी प्रशंसा करावी. दगड जड असतो व वाळू वजनाने भारी असते, पण मूर्खाचा राग ह्या दोहोंहून भारी असतो. क्रोधाची निष्ठुरता व कोपाचा तडाखा ही पुरवली पण प्रेमसंशयापुढे कोण टिकेल? झाकलेल्या प्रेमापेक्षा, उघड शब्दताडन बरे. मित्राने केलेले घाय खर्‍या प्रेमाचे आहेत, पण वैरी चुंबनांची गर्दी उडवतो. तृप्त जिवाला मधाचा वीट येतो, पण भुकेल्या जिवाला कोणताही कडू पदार्थ गोड लागतो. स्वस्थान सोडून भ्रमण करणारा मनुष्य आपले कोटे सोडून भटकणार्‍या पक्ष्यासारखा आहे. तेल व सुगंधी द्रव्ये मनाला आल्हाद देतात, त्याप्रमाणे मनापासून मसलत देणार्‍या मित्राचे माधुर्य होय. स्वत:च्या व आपल्या बापाच्या मित्राला सोडू नकोस; आपल्या संकटसमयी भावाच्या दारी जाऊ नकोस; दूर असलेल्या आपल्या भावापेक्षा जवळ असलेला शेजारी बरा. माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणार्‍यास मी प्रत्युत्तर देईन. चतुर मनुष्य अरिष्ट येत आहे असे पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि हानी पावतात. अनोळख्याला जो जामीन होतो त्याचे वस्त्र ठेवून घे; जो परस्त्रीला जामीन होतो त्याला तारणादाखल ठेव. कोणी मोठ्या पहाटेस उठून उंच स्वराने आपल्या मित्रास आशीर्वाद दिला, तर तो त्याला शाप होय असे मानतील.