बराच वेळ धीर धरल्याने न्यायाधीशाचे मन वळते, नरम जीभ हाड फोडते. मध सापडल्यास तुला तो पुरे इतकाच खा. जास्त खाल्लास तर तुला वांती होईल. शेजार्याच्या घरी आपले पाऊल विरळा टाक, नाहीतर त्याला कंटाळा येऊन तो तुझा द्वेष करील. जो शेजार्याविरुद्ध खोटी साक्ष देतो तो घण, तलवार व तीक्ष्ण बाण ह्यांसारखा आहे. संकटसमयी विश्वासघातक्यावर भरवसा ठेवणे हे तुटलेल्या दाताने खाणे, लचकलेल्या पायाने चालणे ह्यांसारखे आहे. थंडीच्या दिवसांत अंगावरील पांघरूण काढणे, सोर्यावर शिरका घालण्यासारखे आणि खिन्न हृदयापुढे गायन करण्यासारखे आहे. तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे, तान्हेला असल्यास त्याला पाणी प्यायला दे; असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू निखार्यांची रास केल्यासारखे त्याला होईल. आणि परमेश्वर तुला प्रतिफळ देईल. उत्तरेचा वारा पाऊस आणतो, त्याप्रमाणे चुगलखोर जीभ मुद्रा क्रोधाविष्ट करते. भांडखोर बायकोबरोबर प्रशस्त घरात राहण्यापेक्षा धाब्याच्या एका कोपर्याला बसणे पुरवले. तान्हेल्या जिवाला जसे गार पाणी तसे दूर देशाहून आलेले शुभवर्तमान होय. दुर्जनापुढे स्थानभ्रष्ट झालेला नीतिमान हा गढूळ केलेला झरा, नासलेले जलकुंड ह्यांप्रमाणे आहे. मधाचे अतिसेवन करणे बरे नाही; तसेच मनुष्याने आपल्या गौरवाच्या पाठीस लागण्यात काही अर्थ नाही. ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, तो गावकुसू नसलेल्या पडक्या गावासारखा आहे.
नीतिसूत्रे 25 वाचा
ऐका नीतिसूत्रे 25
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 25:15-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ