रुपेरी करंड्यात सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय. सोन्याचे कर्णभूषण आणि उत्कृष्ट सोन्याचा दागिना, तसा सुज्ञ उपदेशक लक्ष देणार्या कानाला आहे. कापणीच्या समयी जसे बर्फाचे पेय, तसा विश्वासू जासूद त्याला पाठवणार्याला आहे, कारण तो आपल्या धन्याचा जीव गार करतो. मेघ व वारा असून वृष्टी नाही, त्याप्रमाणे आपल्या देणग्यांची खोटी आढ्यता मिरवणारा आहे. बराच वेळ धीर धरल्याने न्यायाधीशाचे मन वळते, नरम जीभ हाड फोडते.
नीतिसूत्रे 25 वाचा
ऐका नीतिसूत्रे 25
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 25:11-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ